Uncategorizedताज्या घडामोडीमुंबई

मुंबईकरांनो रविवारी लोकलने प्रवास करताय?, मग पाहा कुठे आहे रेल्वेचा मेगाब्लॉक…

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहारदरम्यान आणि पनवेल-वाशीदरम्यान मध्य रेल्वेने उद्या, रविवारी मेगाब्लॉक घोषित केला आहे. बोरिवली आणि भाईंदर रेल्वे स्थानकांदरम्यान शनिवारी व रविवारी मध्यरात्री ब्लॉक घेण्यात येणार असल्याने रविवारी दिवसा पश्चिम रेल्वेवर ब्लॉक असणार नाही. ब्लॉकमुळे काही लोकल फेऱ्या विलंबाने धावणार असून काही लोकल फेऱ्या रद्द राहतील.

मध्य रेल्वे (मुख्य मार्ग)

स्थानक- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार

मार्ग- अप-डाउन धीमा

वेळ- सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५

परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते विद्याविहारदरम्यान धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. यामुळे काही लोकल फेऱ्या रद्द होणार असून काही लोकल फेऱ्या विलंबाने धावतील.

हार्बर रेल्वे

स्थानक- पनवेल-वाशी

मार्ग- अप आणि डाउन

वेळ- सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५

परिणाम- ब्लॉक कालावधीत सीएसएमटी ते पनवेल/बेलापूर दरम्यान अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द राहणार आहेत. ठाणे- वाशी/नेरुळ आणि बेलापूर/नेरुळ – खारकोपर सेवेवर ब्लॉकचा परिणाम होणार नाही. सीएसएमटी-वाशीदरम्यान विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

स्थानक- बोरिवली ते भाईंदर

मार्ग- अप आणि डाउन फास्ट

वेळ- रात्री ११.४५ ते पहाटे ४.४५

परिणाम- ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल फेऱ्या धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहेत. शनिवार-रविवार मध्यरात्रीच्या या ब्लॉकमुळे रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक असणार नाही.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button