breaking-newsमहाराष्ट्र

आमदार बच्चू कडूंचा घणाघात; अवधूत वाघचा डीएनए पाकिस्तानी

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचा उल्लेख लावारिस असा करणारे भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांच्यावर आमदार बच्चू कडू यांनी टीकास्त्र सोडले आहे. अवधूत वाघ याचा डीएनए तपासला पाहिजे, त्याचा डीएनए बहुधा पाकिस्तानचा असावा, तो बेवारसची औलाद आहे, अशा शेलक्या शब्दात त्यांनी वाघ यांच्यावर टीका केली आहे.

भाजपाचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी शुक्रवारी शेतकऱ्यांच्या मुलांबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. या ट्विटनंतर त्यांच्यावर सर्वस्तरातून टीका होत आहे. या पार्श्वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यात प्रचारासाठी आलेले आमदार बच्चू कडू यांनी नेर येथे वाघ यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला. आमदार कडू म्हणाले, अवधूत वाघचा डीएनए तपासून बघितला पाहिजे, तो बहुधा पाकिस्तानचा असावा. त्याला आत्महत्येचे दु:ख आणि वेदना समजत नाही. तुमच्या (भाजपा) आणि काँग्रेसच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करावी लागते. निवडणुकीनंतर वाघ यांना त्यांच्या वक्तव्याचा जाब विचारू आणि तेव्हा त्यांना कानाखाली मारु, अशी धमकीच आ. कडू यांनी दिली.

एम्बेड केलेला व्हिडिओ

LoksattaLive

@LoksattaLive

VIDEO | देशी दारूच्या दुकानासमोर दूध वाटप, वैशाली येडे यांची प्रचाराची भन्नाट शक्कलhttp://Loksatta.com 

LoksattaLive यांची इतर ट्विट्स पहा

दरम्यान, मराठा क्रांती वॉरियर या ट्विटर हँडलवरुन शेतकरी पुत्र आणि सर्वसामान्यांचा आवाज असणाऱ्या असलेल्या पत्रकारांना ट्रोल करू नका असा इशारा देण्यात आला होता. यावर उत्तर देताना अवधूत वाघ यांनी आक्षेपार्ह भाषा वापरत पातळी सोडली. ‘आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याची मुले अनाथ म्हणजे लावारिस असतात बाबा’, असं उत्तर अवधूत वाघ यांनी दिलं. त्यांच्या या ट्विटनंतर सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button