breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार जगतापांच्या हस्ते लाभार्थ्यांना संजय गांधी पेन्शन योजना पत्रांचे वाटप

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – चिंचवड विधानसभा संजय गांधी निराधार योजना समितीच्या वतीने ३० विधवा महिला, २० ज्येष्ठ नागरिक, १० अपंग, ३ मूकबधिर, २ कर्णबधिर आणि घटस्स्पोटीत अशा एकूण ६८ नागरिकांना योजनेच्या मंजुरीचे पत्र आमदार लक्ष्मन जगताप यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

यावेळी हवेली संजय गांधी तहसीलदार राधिका बारटक्के, चिंचवड विधानसभा संजय गांधी योजना समितीचे अध्यक्ष नरेंद्र माने, ज्येष्ठ नगरसेविका माई ढोरे, संजय गांधी योजना मा. अध्यक्ष गोपाळ माळेकर, सदस्य दिलीप गडदे, संजय मराठे, राजेंद्र पाटील, अश्विनी तापकीर, अदिती निकम, चैत्राली शिंदे, नायब तहसीलदार मुळाशी मेघ देशमुख, नायब तहसीलदार हवेली विमल डोलारे, शीतल शिर्के, नगरसेविका माधवी राजापुरे, सिमा चौगुले, संतोष जगताप, अभय नरवडेकर, दीपक जाधव आदी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले की, भविष्यात चिंचवड मतदार संघात एकही लाभार्थी शासनाच्या योजनेपासून वंचित राहू नये. याची काळजी सर्व सदस्यांनी घ्यावी.  संजय गांधी योजनेचे कार्यालय आकुर्डी तहसीलमध्ये सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील व विभागीय आयुक्त दीपक म्हैसकर यांच्या सोबत बैठक झाली. लवकरच याबाबतचे आदेश निघतील.

तहसीलदार राधिका बारटक्के म्हणाल्या, आठ विधानसभा मतदार संघापैकी चिंचवड विधानसभा समितीचे काम प्रथम क्रमांकाचे असून जे काही भविष्यात सहकार्य लागेल ती मदत करण्यास आम्ही तयार आहोत.

या कार्यक्रमात नूतन सदस्य संजय मराठे व राजेंद्र पाटील यांची संजय गांधी योजनेच्या सदस्य पदी निवड झाल्याबद्दल तसेच पिंपरी-चिंचवड महापालिका आदर्श पर्यावरण संतुलित सोसायटी बक्षीस योजना तपासणी समितीवर संतोष जगताप यांची निवड झाल्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वीकृत नगरसेवक गोपाळ माळेकर यांनी केले.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button