breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

आपल्या फोनमध्ये आपण काय करतो हे सर्व गुगलला माहित असतं…

आपण सर्व हे तर एकूण असू की आपल्या फोनमध्ये जे काही पाहतो, किंवा सर्च करतो ,कोणत्या अॅपचा वापर करत आहोत, कधी आणि कुठे याचा वापर केला आहे, हे सर्व काही गुगलला माहित असतं…Activity controls चे काम फोनच्या सर्व अॅक्टिविटीजला ट्रॅक करण आहे. त्यामुऴे आपण काय सर्च करत आहात, कोणती वेबसाईट ओपन केली आहे. कोणता व्हिडिओ पाहात आहोत. कोणत्या जागेवर जात आहोत. हे सर्व गुगलच्या Activity controls मध्ये सेव्ह होतं. आणि याबाबत गुगलचं म्हणणं आहे की, अॅक्टिवेट डेटावरून तुम्हाला सर्च रिजल्ट आणि गुगल प्रोडक्टवर कस्टमाइज्ड एक्सपिरियन्स मिळतो.

आता गुगलवर आसणारा आपला डेटा आपण कसा चेक करू शकतो ते पाहुया…

यासाठी आपल्या स्मार्टफोनच्या गुगल सर्च मध्ये जाऊन My Activity ला सर्च करायचं.
आता सर्वात वरच्या लिंकला म्हणजे myactivity.google.com वर टॅप करायंचं.
यात आपण कधी कोणत्या अॅपचा वापर केला आहे. कोणत्या वेबसाईटवर कोणते आर्टिकल वाचले किंवा यूट्यूबवर कोणता व्हिडिओ पाहिला सर्व माहिती दिसते.

आता गुगलवर आसणारा आपला डेटा कसा डिलीट करायचा ते पाहुया…

जर डेटा डिलीट करायचा असेल तर गुगलने हा सुद्धा पर्याय दिला आहे.
यासाठी myactivity.google.com गेल्यानंतर याच ठिकाणी सर्च बार सोबत तीन डॉट्सवर टॅप करायच. आता Delete activity by या ऑप्शन वर जायचं.
या ठिकाणी Last hour, Last Day, All time और Custome Range चे पर्याय दिसतील. आपल्या सोयीप्रमाणे पर्याय निवडून डेटा डिलिट करू शकतो…

तुम्हाला समजलं असेलचं तर हे एकदा नक्की करून पहा…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button