ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रराजकारण

आपणच राँग साईडने यायचं आणि ‘पोलिसांना सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं’ हे चालणार नाही : अजित पवार

पुणे | महाईन्यूज |

आपण आता सरकारमध्ये आहोत. त्यामुळं आपणच काही चुकीचं करायचं नाही. नाहीतर रॉंग साईडने यायचं आणि ‘पोलिसांना सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं’ हे चालणार नाही, अशा शब्दात राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज दिली आहे. ते पुण्यात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलत होते.

यावेळी अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना आपल्या शैलीत फटकारे लगावत चांगलीच समज दिली.. ते म्हणाले की, आपलं सरकार आलंय म्हणून वाळू माफिया, स्क्रॅप माफिया यांच्यापासून सावधान रहा. आपणच काही चुकीचं करायचं नाही. रॉंग साईडने यायचं आणि ‘पोलिसांना सांग रे तुझं बक्कल नंबर म्हणायचं’ हे चालणार नाही. लोक कुठल्याच नेतृत्वाला गृहीत धरून चालत नाहीत, असंही ते म्हणाले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण आमदारांमध्ये एक पंचमांश जागा पुणे जिल्ह्याने दिल्या आहेत. पक्षासाठी काम करणाऱ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना पक्षाकडून महामंडळं देणार आहोत. मागच्या सरकारनं केलेल्या बदलांमुळं त्रास होत असेल तर लक्षात आणून द्या. त्यामध्येही बदल करु, असही यावेळी अजित पवार म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button