breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

‘आदित्य ठाकरे शिवाजी पार्क मैदानावर घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ’

मुंबई | महाईन्यूज

मुख्यमंत्री पदासाठी शिवसेना आणि भाजपा हे दोन्ही पक्ष आपापल्या मागण्यांवर ठाम असल्याने सत्तास्थापनेचा गुंता अधीक वाढत चालला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यात सरकार स्थापन न झाल्यास राष्ट्रपती राजवट लागू होण्याची भीती व्यक्त होत आहे. असे असताना एक मोठी माहिती समोर आली आहे. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची माहिती त्यांच्या एका जवळच्या सहकाऱ्यानं दिली आहे.

युवासेना सदस्य राहुल कनाल यांनी यासंदर्भात एक ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांचा फोटो शेअर केला आहे. काही दिवसात शिवतीर्थावर हा आवाज घुमेल… मी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू आदित्य उद्धव ठाकरे ईश्वराची शपथ घेतो की… असा संदेशही त्यांनी यामध्ये लिहिला आहे.

शिवसेनेच्या अनेक कार्यकर्त्यांकडून आदित्य ठाकरे हेच मुख्यमंत्री होतील, असं म्हटलं जात आहे. तसंच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानाबाहेर एक बॅनर लावण्यात आलं आहे. माझा आमदार, माझा मुख्यमंत्री असं लिहित त्यावर युवासेना प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांचा फोटोही लावला होता. शिवसेनेचे नगरसेवक हाजी हलीम खान यांनी हे बॅनर्स लावले होते. आदित्य ठाकरे यांच्या फोटोसह ‘माझा आमदार, माझा मुख्यमंत्री’ आणि साहेब आपण करून दाखवलं असाही संदेश त्यावर लिहिण्यात आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button