breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आता सोप्या पद्धतीनं काढा PF अकाऊंटमधून अ‍ॅडव्हान्स पैसे

नवी दिल्ली | कोरोनाच्या जीवघेण्या संसर्गामुळे प्रत्येकावर आर्थिक संकट ओढावलं आहे. अशात केंद्र सरकारने कर्मचार्‍यांच्या PF संदर्भात महत्त्वाचा निर्णय जाहीर केला आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून आता आगाऊ रक्कम काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊन आणि आर्थिक अडचणींमुळे सरकारने काही कालावधीसाठी ही सूट दिली आहे. केंद्र सरकारने नियम शिथिल केल्यानंतर EPFO द्वारे कर्मचार्‍यांनीही याचा लाभ घेता येणार आहे.

EPFO ने जाहीर केलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून, 38,71,664 लोकांनी कर्माचारी भविष्य निर्वाह निधीतून आतापर्यंत 44,054.72 रुपये काढले आहेत. यामध्ये कोविड -19 संबंधित क्लेम सुद्धा देण्यात आले असल्याची माहिती कामगारमंत्री संतोष गंगवार यांनी दिली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फक्त महाराष्ट्रातूनच 25 मार्च ते 31 ऑगस्ट या कालावधीत 7,23,986 कर्मचार्‍यांनी सुमारे 8,968.45 कोटी रुपये काढले आहेत.

PF काढण्याची प्रोसेस पाहून घ्या…

  1. कर्मचारी भविष्य निर्वाह निधीतून पैसे काढण्यासाठी आधी तुम्हाला EPFO च्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन लॉगिन करावं लागेल. यानंतर UAN आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. यावेळी तुमचं PF खातं आधारशी जोडलेलं असलं पाहिजे.
  2. या पोर्टलवर लॉगिन केल्यानंतर Online Service वर क्लिक करा आणि Claim (Form-31, 19 & 10C) ला निवडा.
  3. यानंतर तुम्हाला बँक अकाऊंट नंबर टाकून Verify वर क्लिक करा. पुढे Yes वर क्लिक करून Proceed For Online Claim असा पर्याय निवडा.
  4. ऑनलाईन फंड काढण्यासाठी PF Advance (Form 31) निवडा. आता इथे तुम्हाला ही रक्कम का काढायची आहे, याचं कारण लिहावं लागेल आणि तुमचा पत्ता लिहावा लागेल.
  5. पैसे काढण्यासाठी तुम्ही जे कारण सांगितलं आहे, त्यासंबंधीची कागदपत्रं तुम्हाला स्कॅन करून जोडावी लागतील. EPF अकाऊंटमधून पैसे काढण्यासाठी तुम्हाला कंपनीचीही परवानगी घ्यावी लागेल.
  6. कंपनीची परवानगी मिळाल्यानंतर तुमच्या बँकेमध्ये पैसे जमा होतील. यावेळी तुम्हाला रजिस्टर मोबाईल नंबरवर एक मेसेज मिळेल. बँकेत पैसे ट्रान्सफर होण्यासाठी काही ठराविक कालावधी लागतो.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button