breaking-newsक्रिडा

आता राजीव शुक्ला लवकरच बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदी, माहिम वर्मा यांनी दिला राजीनामा

आयपीएलचे माजी चेअरमन राजीव शुक्ला आता पुन्हा एकदा भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) सक्रिय हाेण्याचे चित्र आहे. यासाठी त्यांच्याकडे मंडळाच्या उपाध्यक्षपदाची सूत्रे येणार आहेत. यासाठीची अधिकृत अशी घाेषणा लवकरच बीसीसीआयकडून केली जाईल.


नुकतीच माहिम वर्मा यांची उत्तराखंड क्रिकेट संघटनेच्या सचिवपदी निवड झाली. मंडळाच्या घटनेनुसार एका व्यक्तीला लाभाची दाेन पदे भूषवता येत नाहीत. त्यामुळे त्यांनी बीसीसीआयच्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यामुळे हे पद रिक्त आहे. मंडळाच्या नियमानुसार येत्या ४५ दिवसांत विशेष सर्वसाधारण सभेमध्ये या पदावरील नियुक्ती गरजेची आहे. मात्र, सध्या लाॅकडाऊनमुळे ही बैठक लांबणीवर पडण्याचे चित्र आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button