breaking-newsताज्या घडामोडीमुंबईव्यापार

आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजारात मोठी उसळी

मुंबई – सोमवारी शेअर बाजार आतापर्यंतच्या उच्चांकाच्या जवळ जाण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच अखेर सेंसेक्सनं उच्चांक गाठला. अमेरिकन निवडणूकीचा निकाल निश्चित झाल्यानं आशियातील बाजारात दमदार खरेदीचा माहोल दिसून आला.

भारतीय बाजारात गेल्या आठवड्यापासूनच परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा ओढा पाहायला मिळत होता. तेच चित्र आणि अशीच तेजी सोमवारीसुद्धा कायम राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली.

सोमवारी निफ्टीचा उच्चांक १२४२४ वर पोहोचला. शुक्रवारी संध्याकाळी निफ्टी १२२६३वर असल्य़ाचं पाहाला मिळालं होतं.दरम्यान सेन्सेक्स आतापर्यंतच्या सर्वोच्च स्तरावर पोहोचून निफ्टीचाही नवा उच्चांक पाहायला मिळाल्यामुळं दिवाळीआधीच शेअर बाजारात फटाके फुटले असल्याचं वातावरण आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button