breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

आज ‘राष्ट्रीय कन्या दिन’;मुलगा आणि मुलगी यामधील भेदभाव मिटवण्यासाठीचा एक महत्त्वपूर्ण दिवस

आज ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ आहे. तसेच जगभरात 11 ऑक्टोबर रोजी ‘जागतिक कन्या दिन’ साजरा केला जातो. मुलींच्या अस्तित्वाचे महत्त्व समाजापर्यंत पोहोचावं, त्यांना सर्व क्षेत्रात समान संधी मिळावी, शिक्षणाचा हक्क मिळावा, मुलगा- मुलगी यातील भेदभाव कमी व्हावा, या उद्देशाने ‘राष्ट्रीय कन्या दिवस’ देशभर साजरा करण्यात येतो.

भारतात पुरुषप्रधान संस्कृती आहे. त्यामुळे अनेकवेळा पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांना कमी लेखले जाते. मात्र, असं असलं तरी, स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आपला ठसा उमठवला आहे. आज महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपलं नाव कमावलं आहे. त्यामुळे मुलगा-मुलगी हा भेद सध्या कमी झाला आहे. मात्र असं असलं तरी अद्याप काही राज्यात स्त्रीभृण हत्येंच प्रमाण वाढत आहे. त्यामुळे स्त्री-भृण हत्येला थारा देणाऱ्या नागरिकांमध्ये मुलगा आणि मुलगी यामधील भेदभाव मिटवण्यासाठी राष्ट्रीय कन्या दिवस एक महत्त्वपूर्ण दुवा ठरत आहे.

याशिवाय सरकारकडून मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतात. यासाठी सरकारने अनेक योजनादेखील राबवल्या आहेत. या सर्व योजना पुरुष आणि स्त्रियांमधील भेदभाव मिटवण्यास उपयुक्त ठरत आहेत. त्यामुळे मुलीकडे ओझं म्हणून पाहण्याचा दृश्यष्टीकोण हळूहळू बदलत आहे.

प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात स्त्रीचं अनन्य साधारण महत्त्व असतं. याशिवाय देशाच्या विकासातदेखील महिलांचा मोठा वाटा आहे. राष्ट्रीय कन्या दिन साजरा करण्यामागे मुलगा-मुलगी हा लिंगभेद कमी व्हावा, मुलींना सन्मान आणि प्रत्येक क्षेत्रात संधी मिळावी, मुलींचे आरोग्य, शिक्षण आणि पोषण याबाबत लोकांमध्ये जागृकता निर्माण व्हावी, असा उद्देश आहेत. यंदाचा कन्या दिन सर्वांनी आनंदाने आणि मुलीचा सन्मान म्हणून साजरा करावा हीच अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button