breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव हाणून पाडा – छगन भुजबळ

मुंबई – सरकारचा आरक्षण संपवण्याचा डाव असून, तो आपण हाणून पाडायला हवा, अशा शब्दांत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारवर टीका केली. तसेच, कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदींना जादूची झप्पी दिली, मोदी काय वेगळं करतात, तेही वेगवेगळ्या देशांच्या पंतप्रधानांना जादूची झप्पीच देत सुटतात, अशा शब्दांत भुजबळांनी मोदींना टोला लगावला.

मुंबईतील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मार्गदर्शन शिबिरात छगन भुजबळांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी अजित पवार व पक्षाचे नेते उपस्थित होते. छगन भुजबळ म्हणाले, आज शिवसेना मुंबईत पाय रोवून उभी आहे. कारण त्यांनी त्यांचा प्रभाग, त्यांच्या मतदारसंघात जनसंपर्क वाढवला आहे. शिवसेनेचे कार्यकर्ते प्रत्येक प्रश्नावर आंदोलन करतात आणि आपले कार्यकर्ते फक्त आदेश मागतात. यापुढे आदेश मागायचा नाही. “एकतर नमस्कार, नाहीतर चमत्कार’ असे काम करा, असे त्यांनी सांगितले.

महाराष्ट्राच्या छाताडावर झाडलेली बुलेट ट्रेन आहे. मुंबईचे गुजरात करायचा डाव सुरु झाला आहे. पंतप्रधान कुठचे आहेत, देशाचे का गुजरातचे?, असा सवाल करत भुजबळांनी बुलेट ट्रेनलाही विरोध केला.

राष्ट्रवादी कॉंग्रेस हीच तुमची ओळख आहे. काही कार्यकर्ते पद मिळाल्यानंतर स्वतःची आर्थिक पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करतात. हे प्रकार आमच्यापर्यंत नंतर समोर येतात. अशा प्रकारांमुळे पक्ष बदनाम होतो, असे म्हणत अजित पवारांनी कार्यकर्त्यांना सुनावले. दरम्यान, मुंबईमध्ये पक्षात आता नवीन चेहऱ्याला संधी मिळलायला पाहिजे. जुने चेहरे मार्गदर्शन करायला नक्कीच सोबत राहतील, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

विधानसभेआधी शिवसेनेचा भडका उडणार – अजित पवार 
शिवसेना संभ्रमावस्थेत असून त्यांना काय करायचे हेच कळत नाही. त्यातच मित्रपक्षाकडून त्यांची खूप अवहेलना होत आहे. मंत्री आणि आमदार नाराज आहेत, विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेचा भडका उडणार आहे, असे पवार म्हणाले. राहुल गांधी यांनी बाकावर बसून जे (डोळे मिचकावणे) केले, ते करायला नको होते, तिथे थोडी गडबड झाली. त्याच्यात गांभीर्य नसल्याची टीका सुरु झाली. तसेच, राहुल गांधी यांनी गळाभेट घेतली, त्यात काय चुकीचे? मोदी परदेशात अनेकांच्या गळाभेट घेतात, असे म्हणत त्यांनी राहुल गांधी यांची पाठराखण केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button