breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

आघाडी सरकारची आज बहुमत चाचणी

  • १७० आमदारांच्या पाठिंब्याचा दावा

मुंबई | गेल्या महिनाभरातील नाटय़मय घडोमाडींनंतर सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र विकास आघाडी सरकारच्या वतीने आज, शनिवारी विश्वासदर्शक ठराव मांडण्यात येणार असून, यानिमित्ताने शक्तिप्रदर्शनही केले जाईल. हा ठराव आवाजी मतदानाने मंजूर केला जाणार असला तरी १७० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा महाआघाडीने केला आहे. यावेळी काही गडबड होऊ नये म्हणून विधानसभेचे हंगामी अध्यक्ष भाजपचे कालिदास कोळंबकर यांच्याऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप वळसे-पाटील यांची शुक्रवारी नियुक्ती करण्यात आली.

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी महाराष्ट्र विकास आघाडी सरकारला ३ डिसेंबपर्यंत विश्वासदर्शक ठराव मंजूर करण्याची मुदत दिली होती. त्यानुसार आजपासून सुरू होणाऱ्या दोन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विश्वासदर्शक ठराव मंजूर केला जाईल. हंगामी अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कामकाजात विश्वासदर्शक ठराव आवाजी मतदानाने मंजूर करण्याची सत्ताधाऱ्यांची योजना आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, अपक्ष आणि छोटय़ा पक्षांसह आघाडीला १७० पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे हा ठराव मंजूर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही, असा दावा राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी केला. विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यावर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांची सुटका होईल. मतांची फाटाफूट होऊ नये म्हणून तिन्ही पक्षांनी आपापल्या आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button