breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

आईने कशी शिकवण दिली माहिती नाही, बाप म्हणून माफी मागतो- कुमार सानू

प्रसिद्ध गायक कुमार सानू यांचा मुलगा जान कुमार सानू याने ‘बिग बॉस १४’च्या घरात मराठी भाषेविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. मराठी भाषेची चीड येते, असं विधान त्याने केल्यानंतर सर्वच स्तरातून त्याच्यावर टीका झाली. याप्रकरणी कलर्स वाहिनीने, जान सानूच्या आईने आणि स्वत: जान सानूने माफी मागितल्यानंतर आता त्याचे वडील कुमार सानू यांनी संपूर्ण महाराष्ट्राची हात जोडून माफी मागितली आहे. एका व्हिडीओद्वारे कुमार सानू यांनी मुलाच्या चुकीबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

“गेल्या ४१ वर्षांत मला महाराष्ट्राने आणि मुंबईने खूप काही दिलंय. मुंबईबद्दल किंवा महाराष्ट्राबद्दल मी कुठलीच चुकीची गोष्ट माझ्या मनातसुद्धा आणू शकत नाही. पण माझ्या मुलाने खूप मोठी चूक केली आहे. त्याच्या आईने त्याला कशी शिकवण दिली माहित नाही, पण त्याच्या वडिलाच्या नात्याने मी सर्वांची हात जोडून माफी मागतो. गेले २७ वर्षे तो माझ्यासोबत राहत नाही”, असं ते म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button