breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
#MeToo अकबर यांची हकालपट्टी करा : पृथ्वीराज चव्हाण
औरंगाबाद – #MeToo मोहिमेत आरोप झालेले परराष्ट्र राज्यमंत्री एम. जे. अकबर यांचा राजीनामा काय वाजत-गाजत घेणार का? मंत्रिमंडळातून त्यांची तातडीने हकालपट्टी करा, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज (शनिवारी) केली.
कॉंग्रेसतर्फे शनिवारी शहरात दुष्काळ आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी पत्रकार परिषदेत चव्हाण म्हणाले, “परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्या हाताखाली एम. जे. अकबर काम करतात. #MeToo मोहिमेत त्यांच्यावर आरोप झाले. ते परदेशातून येतील, त्यानंतर राजीनामा देतील, असे सांगितले जात आहेत. एवढा सन्मान कशासाठी? स्वराज यांनी पंतप्रधानांकडे जाऊन त्यांच्या हकालपट्टीसाठी हट्ट धरला पाहिजे”, असे चव्हाण म्हणाले.