breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे आज दोन तास बंद

मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज (गुरूवार) ओव्हरहेड गँट्रीज बसवण्याचे काम केले जाणार आहे. यामुळे दुपारी १२ ते २ या वेळेत या मार्गावरून होणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. काम सुरु असताना पुण्याला जाणारी वाहतूक रसायनी-माडपदरम्यान बंद राहणार आहे. यामुळे आज वाहतूकदार आणि प्रवाशांची काही काळ गैरसोय होणार आहे. दुपारी दोननंतरच्या वाहतुकीवर त्यांचा मोठा ताण येणार आहे. त्यामुळे गुरुवार हा कोंडीवारच ठरण्याची शक्यता आहे.

आज दुपारी काम गँट्रीज बसवण्याचे काम करण्यात येणार असल्याने सकाळपासूनच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर वाहनांची गर्दी झाली आहे. यामुळे काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे.

यापूर्वी ६ सप्टेंबर २०१८ रोजी खालापूर टोलनाक्यावरील महत्त्वाच्या दुरुस्तीकामांसाठी मुंबईहून पुण्याच्या दिशेने जाणारा द्रुतगती मार्ग दोन तासांसाठी बंद ठेवण्यात आला होता.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button