breaking-newsमनोरंजन

अवघ्या तीन दिवसांत २०० कोटींहून अधिक कमाई

दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत आणि खिलाडी कुमार अक्षय कुमार यांचा ‘2.0’ हा चित्रपट काही दिवसापूर्वीच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीपासूनच त्याची जोरदार चर्चा रंगली होती. विशेष म्हणजे रजनीच्या चाहत्यांनी प्रदर्शनापूर्वीच अॅडव्हान्स बुकींगदेखील केली होती. त्यामुळे हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर गाजणार हे आधीच निश्चित झालं होतं. त्यानुसार झालंदेखील, या चित्रपटाने केवळ दोन दिवसांत शंभर कोटी रुपयांची कमाई केली. तेव्हापासून या चित्रपटाच्या कमाईचा आकडा वाढत असून तीन दिवसामध्ये २०० कोटी रुपयांचा टप्पा पार केला आहे.

‘टाईम्स नाऊ’नुसार,२०१० साली प्रदर्शित झालेल्या रजनीकांतच्या ‘रोबोट’ या चित्रपटाचा सिक्वल ‘2.0’ नावाने प्रदर्शित झाला आहे. एस. शंकर दिग्दर्शित ‘रोबोट’ या चित्रपटाने आठ वर्षांपूर्वी विक्रमी कमाईचा इतिहास रचला होता. आताही या चित्रपटाने सारे विक्रम मोडत केवळ तीन दिवसांमध्ये २१५ कोटी रुपयांची कमाई केली आहे.

taran adarsh

@taran_adarsh
#2Point0 jumps on Day 3 [Sat]… Growth on Day 3 [vis-à-vis Day 2]: 23.46%… Circuits that were performing okay/low have picked up… Day 4 [Sun] should witness further growth… Thu 20.25 cr, Fri 18 cr, Sat 25 cr. Total: ₹ 63.25 cr. India biz. Note: HINDI version.

13.4K
12:55 PM – Dec 2, 2018
Twitter Ads info and privacy
2,211 people are talking about this
Twitter Ads info and privacy
हिंदीमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी २०.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी १८ कोटी, शनिवार २५ कोटी अशी कमाई करत ६३.२५ कोटी रुपयांचा कमाई केली आहे. तर सर्व भाषांमध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची एकूण कमाई पाहिली तर २१५ कोटी रुपये झाल्याचं चित्रपट व्यापार समीक्षक रमेश बाला यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, हा चित्रपट १५ भारतीय भाषांमध्ये प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला आणखी यश मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ‘2.0’ मध्ये रजनीकांतने ‘चिट्टी’ या रोबोटची भूमिका वठविली आहे. तर अक्षयकुमारने पहिल्यांदाच खलनायकाची भूमिका केली आहे. या चित्रपटासाठी मोठ्या प्रमाणावर ‘व्हीएफएक्स’चा वापर करावा लागल्याने ५४३ कोटी रुपये एवढा अवाढव्य खर्च या चित्रपटाच्या निर्मितीसाठी आला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button