breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण नाही, राज्यात लॉकडाऊनचा कोणताही निर्णय नाही – राजेश टोपे

पुणे – दक्षिण आफ्रिकेत पसरलेला ओमिक्रॉनचा एकही रुग्ण भारतात सापडला नसल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे येनी दिली. तसेच हा आजार धोकादायक असल्याचे कुठेही सिद्ध झाले नसल्याचेही त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, असे टोपे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच येत्या 1 डिसेंबरपासून शाळा सुरू होणार आहेत आणि उद्योगही सुरूच राहणार आहेत, असं राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं. राजेश टोपे यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली.

आपल्या देशात ओमिक्रॉनचा एकही रुग्ण सापडला नाही. हा आजार डेंजर आहे हे सिद्धही झालं नाही. मी अभ्यास करून माहिती देत आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोणत्याही दहशतीखाली राहू नये. ओमिक्रॉनचा रुग्ण सापडला नसल्याने सध्या ज्या गोष्टी अनलॉक आहेत, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. जे उद्योगधंदे सुरू आहेत. ते तसेच सुरू राहितील. त्यात काही बदल केला जाणार नाही. शिवाय येत्या 1 डिसेंबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी माझं याबाबत बोलणंही झालं आहे, असं टोपे यांनी सांगतिलं.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button