breaking-newsराष्ट्रिय

अलाहाबाद बॅंकेच्या सीईओंचे अधिकार काढून घेतले

पंजाब नॅशनल बॅंक घोटाळा प्रकरण 

नवी दिल्ली – अर्थमंत्रालयाने पीएनबी बॅंक घोटाळा प्रकरणाशी संबंधीत असल्याच्या आरोपावरून अलाहाबाद बॅंकेचे सीईओ आणि व्यवस्थापकीय संचालक उषा अनंतसुब्रमण्यम यांचे सर्व अधिकार काढून घेतले आहेत. अलाहाबाद बॅंकेच्या संचालक मंडळाला अर्थमंत्रालयाने तसे आदेश दिले आहेत. उषा सुब्रमण्यम या पंजाब नॅशनल बॅंकेच्या माजी प्रमुख आहेत.

अर्थमंत्रालयाने या घोटाळ्याच्या संबंधात खुद्द पंजाब नॅशनल बॅंकेच्या दोन कार्यकारी संचालकांचेही सर्व अधिकार काढून घेतले आहेत अशी माहिती वित्तीय सेवा सचिव राजीवकुमार यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी बोलताना दिली. पंजाब नॅशनल बॅंकेच्या घोटाळा प्रकरणात सीबीआयने आज पहिले आरोप पत्र दाखल केल्यानंतर काहीं तासातच अर्थमंत्रालयाने हा निर्णय घोषित केला आहे. या आरोपपत्रात पंजाब नॅशनल बॅंकेच्या माजी प्रमुख उषा अनंतसुब्रमण्यम यांचेही नाव असून त्यांचा प्रत्यक्ष घोटाळ्यात सहभाग असल्याचे सीबीआयने म्हटले आहे. अनंतसुब्रमण्यम या सध्या अलाहाबाद बॅंकेच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पहात होते.

पंजाब नॅशनल बॅंकेच्या ज्या दोन कार्यकारी संचालकांचे अधिकार काढून घेण्यात आले आहेत त्यांची नाव के. व्ही. ब्रम्हाजी राव आणि संजीव शरण अशी आहेत. या सर्वांना दहा दिवसांपुर्वीच कारणेदाखवा नोटीसा बजावण्यात आल्या आहेत असेही राजीवकुमार यांनी सांगितले

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button