breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अर्णब गोस्वामी यांना नेणार तळोजा कारागृहात
अलिबाग – रिपब्लीक चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी हे रायगडमध्ये न्यायालयिन कोठडीत आहेत. पण त्यांना तिथून हलवून तळोजा कारागृहात नेण्यात येणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव अर्णब गोस्वामी यांना तळोजा कारागृहात हलवण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
अलिबागचे कारागृह हा ऐतिहासिक किल्ला होता. त्याचा उपयोग नंतर कारागृहासाठी झाला. इथली ही जागा सुरक्षित नसल्याचे आयजी यांनी न्यायालयाला पत्र लिहिले होते. सध्या अर्णब आणि इतर दोन आरोपींचा मुक्काम अलिबागच्या पालिका शाळेत आहे. पण लवकरच त्यांना इथून हलविण्याची प्रक्रीया सुरु होणार आहे. अलिबाग जिल्हा कारागृह अधीक्षकांनी यासंदर्भात माहिती दिली.