breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अर्जुन रामपालच्या बहिणीला एनसीबीने पुन्हा बजावले समन्स

मुंबई – ड्रग्स प्रकरणात अभिनेता अर्जुन रामपाल याची बहिण कोमल रामपाल हिला पुन्हा एकदा एनसीबीने समन्स बजावले आहे. तिला याआधी ६ जानेवारी रोजीही समन्स बजावण्यात आले होते. मात्र तेव्हा ती गैरहजर राहिली होती. त्यामुळे तिला पुन्हा समन्स बजावण्यात आला आहे. कोमल रामपाल NCB च्या चौकशी-तपासकार्यात असहकार्य करत असल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.

अर्जुन रामपाल ड्रग्ज प्रकरणात पुरावे नष्ट केल्याचा गंभीर आरोप कोमल रामपालवर आहे. कोमल रामपाल चौकशीसाठी सहकार्य करीत नसल्याने या प्रकरणात कायदेशीर सल्ला घेण्याची प्रक्रिया NCB ने सुरु केली आहे. तसेच, NCB ने पुन्हा एकदा कोमल यांना चौकशीसाठी समन्स बजावले आहे. आता उद्या कोमल रामपाल चौकशीसाठी हजर राहणार की पुन्हा एकदा गैरहजर राहणार, हा प्रश्न आहे.

वाचा :-Ind vs Aus 3rd test: भारताला ४०७ धावांचं आव्हान

अभिनेता अर्जुन रामपालची NCB कडून आतापर्यंतदोन वेळा चौकशी करण्यात आली आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात NCB ने अर्जुन रामपालच्या घरी छापा टाकला होता. त्यावेळी अर्जुन रामपालच्या घरी NCBच्या अधिकाऱ्यांना NDPC अॅक्टनुसार प्रतिबंध असलेली औषधं मिळाली होती. अर्जुनने आपल्या एका नातेवाईकामार्फत बेकायदेशीरपणे ही औषधं घेतली होती. या औषधांसाठी ज्या प्रिस्क्रिप्शनचा वापर करण्यात आला होता ते एक्सपायर झालं होतं.

अर्जुन रामपालने त्यावेळी सांगितलं होतं की, आपण NCBला एक विशेष औषधांचं प्रिस्क्रिप्शनही दिलं आहे. हे प्रिस्क्रिप्शन दिल्लीच्या मनोवैज्ञानिकाने आपल्याला दिल्याचं त्याने म्हटलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button