Uncategorizedक्रिडापुणेमहाराष्ट्र

अर्चन आपटेला सबज्युनियर मुलांचे विजेतेपद; जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धा

पुणे: द्वितीय मानांकित आर्चन आपटेने अग्रमानांकित अनेय कोवेलामुडीचा खळबळजनक पराभव करताना जिल्हा मानांकन टेबल टेनिस स्पर्धेतील सबज्युनियर मुलांच्या एकेरीत विजेतेपद पटकावले. अग्रमानांकित सनत बोकीलने शौनक शिंदेचा पराभव करताना पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले.

सबज्युनियर मुलांच्या अंतिम सामन्यात द्वितीय मानांकित अर्चन आपटेने अग्रमानांकित अनेय कोवेलामुडीचा 11-4, 11-7, 12-10 असा सरळ गेममध्ये पराभव करून खळबळजनक विजयाची नोंद करत विजेतेपद आपल्या नावे केले.

तत्पूर्वी उपान्त्य फेरीत अनेयने पाचवे मानांकन असलेल्या आदी फ्रॅंक अग्रवालचा 11-6, 11-8, 11-7 असा पराभव केला होता. तर अर्चन आपटेने सहावे मानांकन असलेल्या आदित्य जोरीचा 11-7, 11-6, 6-11, 15-13 असा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button