breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपमहाराष्ट्रराष्ट्रिय

अरेरे भयानक ः नाशिकरोड कारागृहातून कैदी फरार; प्रशासनाला दीड वर्षाने जाग

नाशिक । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी ।

नाशिकरोड कारागृहातील कैदी महिन्याभरच्या रजेवर गेला त्यानंतर तो परतलाच नाहीये. मात्र, तब्बल दीड वर्षांनंतर कारागृह प्रशासनाला त्याबाबत जाग आली आहे. याबाबत आता नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. २०२१ च्या मे महिन्यात कैदीने परत येणे अपेक्षित असताना २०२२चा ऑक्टोबर महिना उगवला तरी कैदी परतला नाहीये.

याबाबत अधिक माहिती अशी, मध्यवर्ती कारागृहात प्रकाश कांतीलाल पंचाळ नामक कैदी आपली शिक्षा भोगत होता. कैदीने काही दिवसांच्या सुट्टीची मागणी केल्यानंतर त्याला तीन आठवड्याची सुट्टी मंजूर करण्यात आली. दि. ३० एप्रिल २०२१ पासून १६ मे २०२१ असा त्याच्या सुट्टीचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. त्याप्रमाणे दी. ३० एप्रिल २०२१ पंचाळ सुट्टीवर गेला. मात्र, दी. १६ मे २०२१ रोजी सुट्टी संपल्यावर त्याने कारागृहात परतणे अपेक्षित असताना तो आजतागायत परतलेलाच नाहीये. तब्बल दीड वर्षाचा काळ या दरम्यान लोटल्यानंतर नाशिकरोड कारागृहाला कैदी फरार झाल्याची उपरती होऊन त्यांनी याबाबत नाशिकरोड पोलीस ठाण्यात कैदी फरार झाल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

नाशिकरोड कारागृह प्रशासनाने गुन्हा दाखल केल्यानुसार, तब्बल एक वर्ष कैदी प्रकाश कांतीलाल पंचाळ शोध घेतला असता तो कुठेही आढळून आला नाही. त्यामुळे तो फरार झाला असल्याचे कारागृह प्रशासनाच्या लक्षात आल्याने प्रशासनाच्या वतीने इम्रान हमीद सय्यद यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक जी एम काकड करत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button