breaking-newsमहाराष्ट्र
अयोध्येतील राम मंदिरासाठी ट्रस्टकडे शिवसेनेकडून 1 कोटीची देणगी सुपूर्द
मुंबई – अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी शिवसेनेकडून 1 कोटीची देणगी जाहीर करण्यात आली होती. शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवशीच ही 1 कोटीची देणगी रामजन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टकडे सुपूर्द करण्यात आली.
अयोध्येतील रामजन्मभूमीचा वाद सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर संपुष्टात आला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दोन वेळा अयोध्येचा दौरा केला होता. या दौऱ्यात त्यांनी राम मंदिरासाठी 1 कोटीची देणगीही जाहीर केली होती. सोमवार 27 जुलै रोजी ही देणगी राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या खात्यात आरटीजीएसमार्फत जमा करण्यात आली, अशी माहिती शिवसेना सचिव खासदार अनिल देसाई यांनी दिली. दरम्यान, रविवार 5 ऑगस्ट रोजी अयोध्येतील राम मंदिराचे भूमिपूजन आणि शिलान्यास होणार आहे.