breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराष्ट्रिय

सोन्या-चांदीच्या दराने गाठला ऐतिहासिक उच्चांक…

मुंबई: सोन्याच्या दरात मोठी उसळी आलेली असून २४ कॅरेट गोल्डच्या भावात ऐतिहासिक वाढ झालेली आहे. सोन्याचा आजचा दर हा तब्बल ५३,००० रुपये आहे. तर चांदीचा आजचा दर हा ६५,००० प्रति किलो आहे. देशभरात सराफा बाजारात २४ कॅरेट सोन्याचा दर हा सोमवारी १५६ रुपये प्रति १० ग्रॅम उघडला तर ९६ रुपयाने वाढून ५२,४६५ रुपये बंद झाला आहे. तर चांदीचा दर हा थोडा कमी झालेला आहे.

१७७५ रुपये प्रति किलो नुकसान होऊन ६२,७३० रुपये इतका आता आहे. इंडिया बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसिएशनच्या माहितीनुसार, २८ जुलै २०२० रोजी देशभरात सराफा बाजारात सोने-चांदीचा दर खालील प्रमाणे २४ कॅरेट सोन्याचा दर हा ५२,४६५ प्रति १० ग्रॅम आहे. तर २३ कॅरेटचा दर हा ५२,२५५ रुपये इतका आहे. २२ कॅरेट सोन्याचा दर हा ४८,०५८ इतका आहे. तर १८ कॅरेटचा सोन्याचा दर हा ३९३४९ इतका झालेला आहे. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button