breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

अयोध्येतील राम जन्मभूमी वादानंतर आता कृष्ण जन्मभूमीचेही प्रकरण कोर्टात

अयोध्येतील राम जन्मभूमी वादानंतर आता कृष्ण जन्मभूमीचेही प्रकरण कोर्टात गेले आहे. श्रीकृष्ण विराजमानने मथुरेच्या न्यायालयात दिवाणी खटला दाखल करून १३.३७ एकर जमिनीचा मालकी हक्क मागितला आहे. यासोबतच परिसरातील शाही मशीद आणि ईदगाह हटवण्याची मागणी करण्यात आली आहे.

ही याचिका ‘भगवान श्रीकृष्ण विराजमान’च्या नावाने दाखल करण्यात आली. यात त्यांच्या अंतरंग सखी म्हणून अधिवक्ता रंजना अग्निहोत्री आणि ६ भक्तांचा समावेश आहे. याचिकेनुसार, जेथे आज शाही मशीद व ईदगाह आहे, त्याच ठिकाणी श्रीकृष्णांचा जन्म झाला ते कारागृह आहे.

आता शाही मशीद आणि ईदगाह हटवण्याची मागणी वरून पुन्हा वाद-विवाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button