breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

अमेरिकेने आण्विक करारातून बाहेर पडणे गंभीर चूक – बराक ओबामा

वॉशिंग्टन (अमेरिका) – अमेरिकेने आण्विक करारातून बाहेर पडणे ही मोठी गंभीर चूक असल्याचे प्रतिपादन अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यांनी केले आहे. या दिशाहीन निर्णयाने संयुक्त कारवाई व्यापक योजनेवर (Joint Comprehensive Plan of Action ) वर दुष्परिणाम होण्याची शक्‍यता त्यांनी बोलून दाखवली आहे.
इराणने कोणतीही आगळीक केलेली नसताना संयुक्त कारवाई व्यापक योजनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणे ही फार गंभीर चूक आहे.

इराण, रशिया, चीन, फ्रान्स, आणि जर्मनी यांच्याबरोबर केलेल्या आण्विक करारातून बाहेर पडणे म्हणजे आपल्या विश्‍वासू मित्रपक्षांकडे पाठ फिरवण्यासारखे आहे; असे बराक ओबामा यांनी एका निवेदनात म्हटले आहे. मंगळवारी डोनॉल्ड ट्रम्प यांनी इराण आण्विक करारातून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर बराक ओबामा यांनी हे निवेदन जारी केले आहे.

अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने दिलेल्या माहितीनुसार इराण आण्विक कराराचे पूर्ण पालन करत आहे. त्याने कोणत्याही नियमाचे उल्लंघन केलेले नाही, असे असताना अमेरिकेने करारातून बाहेर पडणे करार धोक्‍यात आणणारे आहे. शिवाय त्यामुळे शस्त्रास्त्रस्पर्धेला जोर येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button