breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेत गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना

वॉशिंग्टन: अमेरिकेत सध्या वर्णद्वेषाच्या मुद्द्यावरून सुरु असलेल्या आंदोलनाने अत्यंत उग्र स्वरुप धारण केले आहे. अमेरिकेच्या अनेक भागांमध्ये सध्या निदर्शने सुरु आहेत. यापैकी वॉशिंग्टन येथील भारतीय दूतावासाबाहेर करण्यात आलेल्या निदर्शनावेळी महात्मा गांधीजींच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. आंदोलकांनी या पुतळ्याची नासधुस केल्याचे समजते. सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. 
जॉर्ज फ्लॉईड या कृष्णवर्णीय व्यक्तीचा पोलिसांच्या अमानुष वागणुकीमुळे मृत्यू झाल्यानंतर आंदोलनाची ठिणगी पडली होती. यानंतर आंदोलनाचे लोण संपूर्ण अमेरिकेत पसरले होते. त्यामुळे सध्या अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे. 

काही दिवसांपूर्वी आंदोलकांनी व्हाईट हाऊसच्याबाहेरही निदर्शने केली होती. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर बंकरमध्ये लपण्याची वेळ आली होती. यानंतर ट्रम्प यांनी आंदोलकांकडून सुरु असलेला हिंसाचार काबूत आणण्यासाठी लष्कराला पाचारण करण्याचा इशारा दिला होता. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button