breaking-newsआंतरराष्टीय

अमेरिकेचा पाकवर ड्रोन हल्ला, टीटीपीचा म्होरक्‍या ठार

इस्लामाबाद – अमेरिकेने पाकिस्तानवर ड्रोन हल्ला करुन तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचा म्होरक्‍या मुल्ला फजल उल्लाहला ठार करण्यात यश मिळवल आहे. यापूर्वी नोव्हेंबर 2013 मध्ये अमेरिकेने असाच हल्ला करत तबाही-ए-तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) हाकिमुल्ला मेहसूदला ठार केले होते.

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेने 13 जूनला हा हल्ला केला होता. मात्र त्यावेळी मुल्ला फजल उल्लाह मारला गेल्यासंबंधी अधिकृत माहिती मिळाली नव्हती. शुक्रवारी अमेरिकेतील न्यूज एजन्सी वॉइस ऑफ अमेरिकेने कमांडर ठार झाल्याची माहिती दिली. अमेरिकेला पाकिस्तान बॉर्डरवर तहरीक -ए-तालिबानचा नवा कमांडर आपल्या काही सहकाऱ्यांसोबत असल्याचे समजले. यानंतर लगेचच अमेरिकेने पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमारेषेवर कुनार प्रांतात ड्रोन हल्ला करत मुल्ला फजल उल्लाहलाचा खात्मा केला. या उल्लाहने सहकाऱ्यांसोबत मिळून डिसेंबर 2014 मध्ये पाकिस्तानातील भीषण दहशतवादी हल्ला केला होता.आर्मी पब्लिक स्कूलवर हा हल्ला करण्यात आला होता. यात 130मुलांसह 151 ठार झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button