breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

अमेरिका ओपन २०२० स्पर्धेत सेरेना विल्यम्सचं आव्हान संपुष्टात

लंडन – टेनिस साम्राज्ञी सेरेना विल्यम्सला पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. यूएस ओपन ग्रँडस्लॅम जिंकण्याचे सेरेनाचे स्वप्न भंगले आहे. सेमी फायनलमध्ये बेलारुसच्या व्हिक्टोरिया अझारेंकाने विल्यम्सला पराभवाचा धक्का दिला.

अझारेंकाने सेरेनाचा १-६, ६-३ आणि ६-३ सेट्समध्ये पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. सेरेनाने पहिला सेटमध्ये ६-१नं जिंकत दणक्यात सुरुवात केली. मात्र दुसऱ्या आणि तिसऱ्या सेटमध्ये अझारेंकाने जोरदार कमबॅक विल्यम्सचा धुव्वा उडवला. फायनलमध्ये अझारेंकाचा मुकाबला नाओमी ओसाकाशी होणार आहे.

या विजयासह, ३१ वर्षीय व्हिक्टोरिया अझारेंकाने आता विल्यम्सवर आपला पहिला विजय मिळवला आहे. एका मोठ्या स्पर्धेत तिने हा पराक्रम केला आहे. ती २४ व्या ग्रँडस्लॅम विजेतेपदाचा दावेदार मानली जात आहे. या विजयामुळे अझरेंकाने विजयी मालिका सलग ११ वेळा करुन दाखविली आहे.

विजयानंतर ती म्हणाली…
अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळाल्यानंतर अझरेंका म्हणाली, “आशा आहे की यामुळे स्त्रियांना त्यांच्या स्वप्नांच्या मागे जाण्याची प्रेरणा मिळते. मला असे वाटते की आपण नेहमीच फक्त एक गोष्ट म्हणून स्वत: ला ओळखू शकत नाही, कारण आपल्या आयुष्यात आपल्याकडे अनेक गोष्टी आहेत. एक पालक ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे, जी मी माझ्या आयुष्यात असू शकते, परंतु मी एक टेनिसपटू, कोर्टातला फायटरही आहे. मला माझ्या वैयक्तिक स्वप्नांच्या मागे जायचे आहे, माझ्या मुलाला प्रेरणा द्यावी लागेल. मला आशा आहे की जगभरातील महिलांना ते माहित असावे. काहीही करणे शक्य आहे. पालक होणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे, म्हणून एकदा आपण त्यात सातत्य ठेवल्यास आपण काहीही करू शकता. “

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button