breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन
अमृता रावने शेअर केला मुलाचा पहिला फोटो!
बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री अमृता राव हिने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. त्यामुळे अमृता आणि तिचा पती आरजे अनमोल पहिल्यांदाच आई-बाबा झाले आहेत. ही आनंदाची बातमी अमृता-अनमोलच्या टीमने शेअर केली आहे. त्यानंतर आता त्यांनी आपल्या मुलाचा पहिला फोटो शेअर केला आहे. तसेच मुलाचे “वीर” असे नाव ठेऊन त्याच्यासाठी आशीर्वाद मागितले आहेत.