breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

अमृता फडणवीस यांच व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर नवं ‘LOVE SONG’…

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या कायम त्यांच्या फोटो , व्हिडिओ तसेच गाणं यांमुळे त्या कायम चर्चेत असतात…अशाच एका गाण्यामुळे त्या पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत यांनी व्हॅलेंटाईनच्या पार्श्वभूमीवर त्यांचं नवं गाणं पोस्ट केलं आहे. अमृता फडणवीस यांचं हे इंग्रजी गाणं ‘लिओनेल रिची’चं कव्हर व्हर्जन आहे.

अमृता फडणवीस यांनी आपल्या युट्यूब चॅनलवर आणि ट्विटरवर हे नवं गाणं पोस्ट केलं आहे. शक्ती हासिजा यांनी या गाण्याचं दिग्दर्शन केलं आहे. प्रसिद्ध इंग्रजी गायक लिओनेल रिचीनं हे मुळ गाणं गायलं आहे. या गाण्यात लिओनेलने एका संगीत शिक्षकाची भूमिका साकारली आहे. या गाण्यात तो एका अंध मुलीच्या प्रेमात पडल्याचंही दाखवण्यात आलं आहे. हेच गाणं आता अमृता फडणवीस यांनी गायलं आहे.

अमृता फडणवीस यांनी हे गाणं पोस्ट करताना हे आपलं आवडतं गाणं असल्याचं म्हटलं. त्यांनी याआधी देखील अनेक गाणी गायली आहेत. बॉलिवूडचे शहेनशाह अमिताभ बच्चन यांच्या हस्ते अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा एक अल्बम देखील रिलिज झालेला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button