breaking-newsताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

अमित शाह यांची ऑनलाइन सभा; भाजपा बिहार निवडणुकीचे रणशिंग फुंकणार!

बिहारमधील आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाने तयारी सुरू केल्याचे दिसत आहे. केंद्रीय गृहमंत्री व माजी भाजपा अध्यक्ष अमित शाह आज(रविवार) या पार्श्वभूमीवर भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहेत. हे मार्गदर्शन ऐकण्यासाठी जवळपास ७२ हजार बुथवर भाजपाकडून व्यवस्था करण्यात आलेली आहे.

जवळपास पाच लाख भाजपा कार्यकर्ते शाह यांचे मार्गदर्शन यूट्युब, फेसबुक लाईव्ह आणि नमो अ‍ॅपच्या माध्यमातून ऐकतील, असा भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. आगामी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात येथील विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगाने भाजपा या ऑनलाइन मेळाव्यातून एकप्रकारे निवडणुकीचे रणशिंगच फुंकणार असल्याचे बोलले जात आहे. भापजाकडून हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहे.

देशावर करोनाचे संकट ओढावलेले असताना व राज्यात करोनाचे रुग्ण वाढत असताना भाजपाला मात्र निवडणुकीतच जास्त रस असल्याचा आरोप विरोधीपक्ष आरजेडी आणि काँग्रेसकडून करण्यात आलेला आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत राज्यात ४ हजार ५०० करोनाबाधित रुग्ण असल्याची नोंद झालेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button