breaking-newsराष्ट्रिय

अमित शहा यांच्या जिल्हा बॅंकेत सर्वाधिक जुन्या नोटा जमा

  • माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून स्पष्ट

  • पाच दिवसांमध्ये 745.59 कोटी रुपये जमा

नवी दिल्ली – नोटाबंदीनंतर सर्वाधिक जुन्या नोटा अमित शाह संचालक मंडळावर असलेल्या अहमदाबाद जिल्हा सहकारी बॅंकेत जमा झाल्याची माहिती समोर आली आहे. नोटाबंदीनंतर अवघ्या पाच दिवसांमध्ये या बॅंकेत 745.59 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्याचे उघड झाले आहे. माहिती अधिकाराअंतर्गत मागवलेल्या माहितीमधून ही बाब समोर आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदी जाहीर केली होती. यानंतर 10 नोव्हेंबरपासून बॅंका व पोस्ट कार्यालयातून जुन्या नोटा बदलून नवीन देण्यात येत होत्या. मात्र पाच दिवसांनी देशभरातील जिल्हा बॅंकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास मनाई करण्यात आली. या पाच दिवसांच्या काळात जमा झालेल्या नोटा सरकारकडून बदलून देण्यात आल्या.

मुंबईतील माहिती अधिकार कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी माहिती अधिकाराअंतर्गत जिल्हा बॅंकेत जमा झालेल्या जुन्या नोटासंदर्भातील माहिती मागवली होती. यात अहमदाबाद जिल्हा बॅंकेने सर्वाधिक जुन्या नोटा जमा केल्याचे समोर आले आहे.

नाबार्डने एका निवेदनात म्हटले आहे की, बॅंकेत नोटाबंदीच्या काळात 745.59 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या. या बॅंकेतील एकूण 17 लाख खातींपैकी केवळ 1.60 लाख ग्राहकांनीच जुन्या नोटा जमा केल्या आहेत. जे एकूण जमा खात्यापैकी 9.31 टक्के आहेत. यात अडीच लाखांपेक्षा कमी रक्‍कम जमा करण्या-यांचे प्रमाण 98.94 टक्‍के आहे.

बॅंकेच्या वेबसाईटवर अमित शाह बॅंकेच्या संचालक मंडळावर असल्याचे दिसते. 2000 साली अमित शाह बॅंकेच्या अध्यक्षपदी होते. यानंतर राजकोट जिल्हा सहकारी बॅंकेचा क्रमांक लागतो. या बॅंकेने सुमारे 693 कोटी रुपयांच्या जुन्या नोटा जमा केल्या. या मुद्‌द्‌यावरुन विरोधक भाजपावर टीका करण्याची शक्‍यता आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button