breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

अमित गोरखे यांनी स्वीकारला अण्णाभाऊ साठे महामंडळाचा पदभार

  • पहिल्याच दिवशी बैठक घेऊन अधिका-यांना दिल्या सूचना
  • मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या विशेष शुभेच्छा

पिंपरी, (महाईन्यूज) – साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या अध्यक्ष पदावर शासनाने दि 6 जून रोजी पिंपरी-चिंचवड भाजपचे युवा कार्यकर्ते आमित गोरखे यांची नियुक्ती केली. त्यानुसार गोरखे यांनी मंगळवारी (दि. 11) महामंडळाच्या अध्यक्ष पदाचा पदभार अधिकृतरित्या स्वीकारून प्रत्यक्ष कामकाजाला सुरूवात केली.

  • महामंडळाच्या योजनांची अमलबजावणी करण्यास गेल्या साडेचार वर्षांपासून मरगळ आलेली होती. आता महामंडळाच्या योजना कार्यक्षमपाने राबवून महामंडळास चालना मिळणार आहे. तसे कामकाज आपण करणार असल्याचे गोरखे यांनी यावेळी संबोधीत केले.

महामंडळाचा पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष अमित गोरखे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी माझ्यावर जो विश्वास टाकला आहे. महामंडळास सुस्थितीत आणण्यासाठी माझी अध्यक्षपदी निवड केली, याबद्दल मी मुख्यमंत्री महोदयांचा व शासनाचा आभारी आहे. तळागाळातील अनुसूचित जातीतील मातंग समाज व तस्तम 12 पोटजातीतील लोकांचा आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक विकास करण्यासाठी मला नियुक्त केले आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या सुरू असलेल्या अनेक योजना गेल्या चार साडेचार वर्षापासून बंद अवस्थेत होत्या. त्या तात्काळ सुरू करण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणार, असा विश्वास अध्यक्ष गोरखे यांनी व्यक्त केला.

  • अध्यक्ष गोरखे यांनी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यालयातील अधिकारी यांची बैठक घेऊन महामंडळाच्या कामकाजाचा आढावा घेऊन महामंडळाच्या पुढील कामकाजाबाबत निर्देश दिले. महामंडळाचे कामकाज पारदर्शी व सक्षमपणे करण्यासाठी सर्वांनी निष्ठेने प्रयत्न करावेत, अशी इच्छा व्यक्त केली. यावेळी महाराष्ट्राच्या विविध जिल्ह्यातून अनेक कार्यकर्ते व विविध अधिकारी- कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी व्यावस्थापकीय संचालक अनिल अहिरे अवर सचिव (सा. न्या. विभाग) यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष गोरखे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button