breaking-newsमनोरंजन

अभिषेक बच्चनच्या ‘ब्रीद: इन टू द शॅडोज’चा तिसरा सीजन येणार?

अभिषेक बच्चनचा ब्रीद: इन टू द शॅडोज’ 10 जुलैला अमेझॉन प्राईम व्हिडीओवर सादर झाला. याला प्रेक्षकांनी तुफान प्रतिसाद दिला. आता, याच सीरिजचा तिसरा सीजन येणार असल्याचीही चर्चा आहे. खुद्द अभिषेक बच्चन यानेच याबात संकेत दिले आहेत.
या मालिकेचा शेवटचा भाग असलेला सी-16 ने प्रेक्षकांमध्ये कुतूहल निर्माण केले आहे. त्यांच्या मनात हा प्रश्न निर्माण केला आहे की हे ‘C-16’ आहे काय? नुकतेच अभिषेक बच्चनने आपल्या सोशल मीडियावर एक ट्वीट केले त्यानंतर प्रेक्षकांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा सुरु झाली आहे कि ब्रीद चा शेवटचा भाग ‘सी-16’ नक्की काय सांगण्याचा प्रयत्न करतोय.

दुसऱ्या सीजनच्या शेवटच्या भागात अविनाश शर्लीला एक चिट्ठी देतो ज्यामध्ये ‘C-16’ असे लिहिलेले आहे. काय अभिषेक तिसऱ्या सीजनकडे इशारा करत आहे? असे वाटतेय की प्रेक्षकांना हे जाणून घेण्यासाठी थोडी वाट बघावी लागेल.

ही सीरीजची निर्मिती अबुंदंतिया एंटरटेनमेंट द्वारे करण्यात आली असून मयंक शर्मा द्वारे रचित आणि दिग्दर्शित आहे आणि याचे लेखन भवानी अय्यर, विक्रम तुली, अरशद सैयद आणि मयंक शर्मा यांनी केले आहे. या मालिकेसोबत अभिनेता अमित साध पुन्हा एकदा वरिष्ठ निरीक्षक कबीर सावंत या आपल्या पुरस्कार प्राप्त भूमिकेत दिसणार असून सोबतच निथ्या मेनन आणि सैयामी खेर यादेखील प्रमुख भूमिकेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button