अभिनेत्री ऐश्वर्या बच्चनसह मुलगी आराध्याला रुग्णालयातून डिस्चार्ज
मुंबई- अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि तिची मुलगी आराध्या कोरोनामुक्त झाले आहेत. आज या दोघींनाही नानावटी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. अभिषेक बच्चन यांनी ऐश्वर्या आणि आराध्याला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्याची माहिती ट्विटरवरून दिली आहे.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण बच्चन कुटुंबियांची कोरोना टेस्ट करण्यात आली होती. यामध्ये अभिषेक बच्चन, ऐश्वर्या बच्चन आणि त्यांची मुलगी आराध्या या तिघांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. तर अमिताभ यांच्या पत्नी जया बच्चन यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. यानंतर अमिताभ बच्चन आणि अभिषेक बच्चन यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु, ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्य बच्चन यांना होम क्वारंटाईन करुन त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले होते. मात्र 17 जुलै रोजी ऐश्वर्या आणि आराध्याला श्वास घेण्यास त्रास आणि ताप आल्यामुळे त्यांना नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.