breaking-newsआंतरराष्टीय

जगभरात 1 कोटी 64 लाख 12 हजार 794 जणांना कोरोनाची लागण; 6 लाख 52 हजार 39 जणांचा मृत्यू

हैदराबाद – जगभरामध्ये कोरोनाची परिस्थिती गंभीर झाली असून दिवसेंदिवस रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत वाढ होत आहे. जगभरात आतापर्यत 1 कोटी 64 लाख 12 हजार 794 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. यातील 1 कोटी 42 हजार 362 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 6 लाख 52 हजार 39 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

अमेरिका, ब्राझील आणि भारतात सर्वाधिक कोरोना रुग्ण आहेत. पहिल्या क्रमांकावर अमेरिका असून तिथे 42 लाखापेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये 23 लाखांचा आकडा कोरोनाग्रस्तांनी पार केला आहे. यापाठोपाठ भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतामध्ये कोरोनाबाधितांची झपाट्याने वाढ होत आहे.

दरम्यान, जगभरातील देश कोरोनावर लस शोधण्याचा रात्रंदिवस प्रयत्न करत आहेत. कोरोनासाठी जगभरात सध्या 145 हून अधिक लसींची निर्मिती करण्यात येत आहे. यापैकी केवळ 20 लसींना मानवी चाचणी करण्याची परवानगी मिळाली आहे, तर भारतामध्ये स्वदेशी विकसित लस ‘कोव्हॅक्सिन’ची मानवी क्लिनिकल चाचणी घेण्यास सुरुवात झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button