breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराजकारण

अबू आझमींच्या सुपुत्राची घोषणा, उद्धव ठाकरेंसोबत अयोध्येला जाणार, “तुम्ही राम मंदिरा बांधा, आम्ही मशीद उभारु”

मुंबई | ठाकरे सरकारमधील मित्रपक्ष असलेल्या समाजवादी पक्षाचे नेते आमदार अबू आझमी यांच्या मुलाने मोठं विधान केलं आहे. अबू आझमींचे सुपुत्र फरहान आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत भाष्य केलं. “मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे 7 मार्चला अयोध्येला जाणार आहेत. मी सुद्धा त्यांच्यासोबत जाईन. ते राम मंदिर बांधतील आणि आपण बाबरी मशीद बांधू” असं फरहान आझमी म्हणाले.

इतकंच नाही तर ठाकरे सरकार 6 ते 8 महिन्यांपेक्षा जास्त चालणार नाही, असंही फरहान आझमी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारला शंभर दिवस पूर्ण होताच अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी स्वत: याबाबतची घोषणा केली. 7 मार्चला उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button