breaking-newsताज्या घडामोडीमुंबई
अबब…माहुलमधील प्रदूषण भोवले, HPCL, BPCL सह चार कंपन्यांना तब्बल 286 कोटींचा दंड
मुंबई: मुंबईतील माहुलमधील प्रदूषण बीपीसीएल, एचपीसीएलसह चार कंपन्यांना भोवलेलं आहे. माहुल गावातील प्रदूषणासाठी चार कंपन्यांना 286 कोटी रुपयांचा दंड राष्ट्रीय हरित लवादाने ठोठावलेला आहे. माहुल हे ईशान्य मुंबईतील जुने गाव आहे. या ठिकाणी मोठ्या ऑइल कंपन्यांचे प्रकल्प आहेत. कंपन्यांमुळे माहुलमध्ये वायू प्रदूषण होत असल्याची तक्रार हरित लवादाकडे नोंदवण्यात आलेली होती.
लवादाने एजिक लॉजिस्टिक, एचपीसीएल, बीपीसीएल आणि सी लॉर्ड या चार कंपन्यांना दणका दिलेला आहे. चार कंपन्यांना पुढील पाच वर्षात एकूण 286 कोटी रुपयांचा दंड भरण्याचे आदेश राष्ट्रीय हरित लवादाने दिलेले आहेत. हवेचा दर्जा सुधारण्यासाठी दंडातून रक्कम खर्च करण्यात येणार आहे.