breaking-newsराष्ट्रिय

धावत्या बसमध्ये महिलेसमोर हस्तमैथुन

देशाची राजधानी दिल्लीमध्ये दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. काही दिवसांपूर्वी दिल्ली युनिव्हर्सिटीतील एका विद्यार्थिनीसमोर हस्तमैथुन (Masturbation) करणाऱ्या एका व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती. आता पुन्हा एकदा अशीच घटना समोर आली आहे. डीटीसी बसमधून प्रवास करणाऱ्या महिलेसमोर एका व्यक्तीनं हस्तमैथुन केल्याचा धक्कादायक प्रकार दिल्लीत घडला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसमधून महिला प्रवास करत होती ती बस प्रवाशांच्या गर्दीमुळे खचाखच भरली होती. ‘एम्स’च्या पुढे बस गेल्यानंतर आरोपीने पँटची चैन खोलली. संबंधित महिला विरोध करणार इतक्यात त्याने कसलाही विचार न करता थेट तिच्यासमोरच हस्तमैथुन करण्यास सुरूवात केली. या प्रकारमुळे संतापलेल्या महिलेने इतर प्रवाशांच्या मदतीने चालकाला बस थांबवण्यास सांगितलं. त्यानंतर आरोपीने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला मात्र, तिने त्याला पकडलं. महिलेने पीसीआरला फोन करुन पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. किशनदत्त (वय ४५) असं आरोपीचं नाव असून त्याचे रक्ताचे नमुनेही तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. त्याने मद्यसेवन केले होतं का, याचा तपासही केला जाणार आहे, अशी महिती पोलिसांनी दिली. आरोपी पूर्व दिल्लीच्या गाजीपूरचा रहिवासी असून पेंटिंगचं काम करतो, अशी माहिती आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button