breaking-newsआंतरराष्टीय

अफगाणिस्तानात दहशतवादी हल्ल्यात २० जण ठार, ५० जखमी

युद्धग्रस्त अफगाणिस्तानात ‘शांतता येत आहे’, असे अध्यक्ष अश्रफ ग़नी यांनी भर देऊन सांगितल्यानंतरही, अफगाणिस्तानातील निवडणूक प्रक्रियेच्या सुरुवातीलाच हिंसाचाराचे गालबोट लागले आहे. गम्नी यांच्यासोबत निवडणूक लढवणारे अमरुल्ला सालेह यांच्या काबूलमधील कार्यालयाला लक्ष्य करून रविवारी झालेल्या हल्ल्यात किमान २० लोक ठार, तर ५० जण जखमी झाले.

अध्यक्षपदासाठी होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्याच दिवशी झालेल्या या हिंसाचारामुळे अफगाणिस्तानातील दयनीय सुरक्षाविषयक स्थितीच्या, तसेच यापूर्वीच्या निवडणुकांमधील रक्तपाताच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

रविवारचा हल्ला स्थानिक प्रमाणवेळेनुसार दुपारी ४.४० वाजता सुरू झाला. अमरुल्ला सालेह नेतृत्व करत असलेल्या ‘ग्रीन ट्रेंड’ या संघटनेच्या कार्यालयानजिक प्रचंड स्फोट झाला. सालेह या हल्ल्यात बचावले.

एका आत्मघातकी बॉम्बरने स्फोटकांनी भरलेल्या मोटारचा या इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ स्फोट घडवल्यानंतर या हल्ल्याला सुरुवात झाली आणि नंतर तीन हल्लेखोर इमारतीच्या आत पळाले. त्यांनी सुमारे सहा तास या इमारतीला वेढा घातला होता. हे सर्व हल्लेखोर मारले गेल्यानंतर  इमारतीत अडकलेल्या सुमारे दीडशे लोकांची सुटका करण्यात आली, असे अंतर्गत मंत्रालयाने सांगितले. या हल्ल्यात २० जण ठार व ५० जण जखमी झाल्याची आकडेवारीही त्यांनी दिली.

अद्याप कुठल्याही गटाने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

यापूर्वी रविवारी उत्साही ग़नी यांनी सुमारे १८ वर्षांच्या संघर्षांनंतर देशात ‘शांतता येत आहे’, असल्याचे आणि तालिबानी दहशतवाद्यांशी शांततेची बोलणी केली जातील, असे सांगून आपल्या प्रचाराची सुरुवात केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button