breaking-newsराष्ट्रिय

‘निपाह’ला रोखायचे असेल तर कुराण वाचा – सुन्नी नेता

 कोझीकोड : सध्या केरळमध्ये निपाह व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. निपाह व्हायरसला रोखण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. निपाहला रोखायचे असेल तर कुराण वाचा, असा सल्ला सुन्नी नेते नजर फैजी कुदाथयी यांनी मुस्लिम समाजातील व्यक्तींना दिला आहे.
निपाह व्हायरसपासून बचाव करायचा असेल तर निपाह प्रभावित क्षेत्रातील लोकांनी कुराणमधील ३६ व्या अध्यायातील ‘सुराह-अल-यासीन’ वाचायला हवे, तसेच शेख अब्दुल कादिर जिलानी यांच्या नावाचा एक हजारवेळा जप करायला हवा, असे केल्यास निपाह व्हायरस होणार नाही, असा दावा कुदाथयी यांनी केला आहे.
सुन्नी युवजना संगमचे राज्य सचिव कुदाथयी यांनी हा दावा केला आहे. मनकूस मौलिद एक प्रकारची प्रार्थना आहे. कोणत्याही आजारांपासून बचाव करण्यासाठी मल्ल्याळी लोक याचे वाचन करतात. जवळपास ५०० वर्षाआधी शेख जैनुद्दिन मखदूम यांनी पहिल्यांदा ‘नकूस मौलिद’ चा वापर केला होता.मल्लपुरममध्ये संक्रामक रोगाने थैमान घातले होते. त्यावेळी अशी प्रार्थना करून त्याला रोखण्यात आले होते. ज्यावेळी डॉक्टरही संक्रामक रोगाला थांबवण्यात अपयशी झाले होते त्यावेळी अशा प्रार्थना करून लोक बरे झाले होते, असा दावा कुदाथयी यांनी केला.

एकीकडे कुदाथयी यांनी प्रार्थना करण्याचे आवाहन केले आहे तर दुसरीकडे सलाफी विचारसरणीच्या लोकांनी याला विरोध दर्शवला आहे. अशा प्रकारच्या प्रार्थना या मुस्लिमविरोधी आहे. कारण या प्रार्थनेत अल्लाऐवजी अन्य शक्तींकडून मदत मागितली जाते, असे सीपी सलीम यांनी म्हटलं आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button