breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

अनलाॅकच्या पहिल्याच दिवशी पिंपरी-चिंचवडमध्ये आज 806 नवे पाॅझिटिव्ह

आज बारा जणांचा मृत्यू, शहराबाहेरील दोन जणांचा समावेश

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी -चिंचवड शहरात शुक्रवारी रात्री साडेसात वाजेपर्यंत 806 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. त्यामुळे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 14 हजार 590 झाली आहे. आज दिवसभरात 12 जणांचा मृत्यू झाला. त्यातील 10 जण शहरातील असून, मृतांची संख्या 265 झाली आहे. आजपर्यंत 9587 रुग्ण बरे झाले आहेत.

आज मृत झालेले रुग्ण पिंपळे साैदागर (वय 52), मोशी (वय 75), उद्यमनगर (वय 51), तळवडे ( वय 66 आणि 59), मोहननगर ( वय 62), पिंपळे गुरव (वय 32), आकुर्डी ( वय 59), चिंचवड (वय 65), रावेत (वय 70), देहूरोड (वय 52), चाकण (वय 65) येथील रहिवासी आहेत.

पावसाळा सुरू झालेला असल्यामुळे वैद्यकिय विभाग, पिंपरी चिंचवड महापालिकेमार्फत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अत्यावश्यक कारणाशिवाय घराच्या बाहेर पडू नये. तसेच पावसाच्या पाण्यामुळे मास्क ओला होणार नाही याची काळजी व दक्षता घ्यावी यासाठी किमान एक तरी अतिरिक्त मास्क जवळ बाळगावा, असे आवाहन आरोग्य वैद्यकीय विभागाने केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button