breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘अतिरिक्त आयुक्त’ पद न दिल्याने नाराज होवून वरिष्ठ अधिका-याची स्वेच्छा निवृत्ती?

सहशहर अभियंता प्रवीण तुपेंची नाराजी, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे दिला अर्ज

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद – 3 हे मलाच मिळावे, माझ्या पाठीमागून माझे सहकारी शहर अभियंता पद घेवून सेवानिवृत्त झाले आहेत. माझे कामही चांगले असून मला अद्याप पदोन्नती मिळालेली नाही. त्यामुळे आता महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त पद – 3 हे मलाच द्यावे, अथवा मला स्वेच्छा निवृत्ती मिळावी, अशी मागणी सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांनी केली आहे. अशी माहिती खात्रीलायक सुत्रांनी दिली.

महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासह प्रशासन विभागाकडे त्यांनी अर्ज दाखल केला आहे. त्यांच्याकडे महापालिकेच्या विद्युत, सांस्कृतिक, विज्ञान केंद्र या विभागांचा कार्यभार आहे. महापालिकेत शासन नियुक्‍त दोन व महापालिकेतून पदोन्नती एक असे एकूण तीन अतिरिक्‍त आयुक्‍त पदे आहेत. यातून शासनाने नियुक्‍त अतिरिक्‍त आयुक्‍त पदावर उपजिल्हाधिकारी स्तरावरील अजित पवार व संतोष पाटील यांची नियुक्‍ती झालेली आहे. तर; पालिका स्तरावरील पदोन्नतीतून दिले जाणारे अतिरिक्‍त आयुक्‍तपद अद्याप रिक्‍त आहे. या पदासाठी ‘त्यांनी’ प्रशासनाकडे अर्ज केलेला आहे. परंतू, त्यांना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. या पदाच्या शैक्षणिक अर्हतेत मी बसत असून अतिरिक्त आयुक्तपद मिळावे, अशी मागणी त्यांनी केलेली आहे.

या पदासाठी पात्र असूनही मला डावलले जात असल्याच्या भावनेतून त्यांनी आयुक्त श्रावण हर्डिकर व प्रशासनाकडे स्वेच्छा निवृत्तीसाठी अर्ज दाखल केल्याच्या वृत्ताला प्रशासन विभागाने दुजोरा दिला आहे. याबाबत सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांना दुरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्याला प्रतिसाद दिलेला नाही.

अतिरिक्त आयुक्त पदासाठी चढाओढ..

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पद -3 याकरिता प्रशासनाकडून सेवाज्येष्ठता आणि शैक्षणिक अर्हतेनूसार सहायक आयुक्त आशादेवी दुरगुडे यांना संधी मिळू शकते. मात्र, आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडून अद्यापही हे पद रिक्त ठेवले आहे. या पदासाठी नगरसचिव उल्हास जगताप यांनीही अर्ज दाखल केलेला आहे. त्यानंतर सहशहर अभियंता प्रवीण तुपे यांच्या अर्ज आल्याने याबाबत आयुक्त हर्डिकर हे कोणता निर्णय घेणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button