breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

विनयशील अन् विनम्र पठ्ठयाचा मला अभिमान : वस्ताद उत्तमराव पाटील

  • सांगली जिल्ह्यातील आंतरराष्ट्रीय कुस्ती संकुलातील सभागृहाला आमदार महेश लांडगे यांचे नाव
  • तब्बल २५ वर्षांनंतरही लाल मातीतील लढवय्या गुरू-शिष्याचे नाते अतुट

पिंपरी । प्रतिनिधी
तब्बल २५ वर्षांपूर्वी कुस्तीत शिकवलेले डाव-प्रतिडाव यापलीकडे आपल्या गुरूप्रति तिच विनयशीलता आणि विनम्रता. राजकारणात कर्तुत्व बाजावल्यानंतरही लाल मातीशी इमान जपणारा माझा पठ्ठया आमदार महेश लांडगे याचा मला अभिमान वाटतो, असे गौरवोद्गार कुस्ती क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षक उत्तमराव पाटील यांनी काढले आहेत.

सांगली जिल्ह्यातील कवलापूर उशांत क्रीडा व्यायाम मंडळ संचालित आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील कुस्ती केंद्रामधील बहुउद्देशीय सभागृहाला आमदार महेश लांडगे यांचे नाव देण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन आणि मॅटचे पूजन नुकतेच करण्यात आले.

यावेळी खासदार संजय काका पाटील, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, हिंदकेसरी दीनानाथ सिंग, डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी आदी उपस्थित होते.

सुमारे २५ वर्षांपूर्वी आमदार लांडगे कोल्हापूर येथील कसबा-बावडा तालमीत कुस्तीचे प्रशिक्षण घेत होते. त्यावेळी उत्तमराव पाटील त्यांचे प्रशिक्षक होते. त्याकाळी आमदार लांडगे यांनी जिल्हा, राज्य आणि विद्यापीठस्तरीय कुस्ती स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली होती. मात्र, कालांतराने लांडगे यांनी राजकारणात प्रवेश केला. नगरसेवक, आमदार आणि भाजपा शहराध्यक्ष अशी पदे भूषवली. मात्र, गुरू-शिष्यांमधील नाते कायम आहे.
यावेळी प्रास्ताविक आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तमराव पाटील यांनी केले आणि कुस्ती केंद्राची जडणघडण याची माहिती दिली. उपस्थित मान्यवरांचे स्वागत मंडळाच्या वतीने फेटा स्मृतिचिन्ह बुके देऊन मंडळाच्या वतीने पदाधिकारी विश्वस्त यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील, खजिनदार विष्णू माळी, सचीव तानाजी तावदरकर, विश्वस्त माजी सरपंच प्रकाश माळी, सुधाकर केचे, अशोक तावदरकर कुस्ती कोच दीपक पाटील, सुहास पाटील व कुस्ती केंद्रातील सर्व पैलवान यांनी केलेकार्यक्रमाचे सूत्रसंचालन कुस्ती निवेदक जोतिराम वाजे यांनी केले. आभार मंडळाचे उपाध्यक्ष सदाशिव पाटील यांनी मानले.

राज्य शासनाने खेळाडंना प्रोत्साहन द्यावे : हिंदकेसरी दीनानाथ सिंह
हिंदकेसरी दीनानाथ सिंह म्हणाले की, हरियाणा सारखे छोटे राज्य खेळाडूंसाठी विविध सुविधा आणि त्यांच्या भविष्यावरती लक्ष देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहत त्याप्रमाणे महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्राच्या मल्लांना आर्थिक पाठबळ देऊन पाठीशी राहावे. दादाजी कोंडदेव पुरस्कार प्राप्त दिनकराव सूर्यवंशी म्हणाले की, राष्ट्र बलवान घडवायचे असेल, तर युवा पिढी सदृढ, सशक्त मनाने आणि शरीराने झाली पाहिजे. हेच काम या कुस्ती केंद्रामध्ये उत्तमराव पाटील करत आहेत.

राष्ट्रीय- आंतरराष्ट्रीय मल्ल तयार व्हावेत: खासदार पाटील
खासदार संजय काका पाटील म्हणाले की, ग्रामीण भागामध्ये एवढं सर्व सोयींनीयुक्त असे अद्यावत केंद्र कवलापूरमध्ये पाटील सरांनी आपले सर्वस्व अर्पण करून तयार केले आहे. इथे एक नवीन युवा पिढी तयार करीत आहेत. त्यांचे हे कार्य स्तुत्यनिय आहे . इथून पुढे या केंद्रातून राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर मल्ल तयार व्हावेत, अशी अपेक्षाही खासदार पाटील यांनी व्यक्त केली.

…यासाठी दिले आमदार महेश लांडगेंचे हॉलला नाव!
आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती कोच उत्तमराव पाटील म्हणाले की, लांडगे कुटुंबियांनी कुस्ती क्षेत्राला वाहून घेतले आहेत. आमदार लांडगे यांचे वडील किसनराव लांडगे यांच्यासोबत मी आखाड्यात खेळलो आहे. त्यांचा मुलगा महेश माझा विद्यार्थी आहे. कसबा- बावडा येथील शासकीय कुस्ती केंद्रात माझ्याकडे महेश यांनी कुस्तीचे धडे गिरवले आहेत. लांडगे घराण्याचे कुस्तीचे सेवा केली आहे. २५ वर्षांनंतरही आपल्या गुरूच्या प्रति विनयशीलता, विनम्रता आणि विश्वास जपणाऱ्या महेशचा मला अभिमान वाटतो. महापूराच्या संकटात सांगली आणि कोल्हापूरला तब्बल ६३ ट्रक जीवनावश्यक वस्तुंचे वाटप करण्यात आले. त्यानंतर कोकणातील निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीच्या काळात महेश यांनी २३ ट्रक जीवनाश्यक वस्तुंचे वाटप करीत माणुसकी जपली आहे. असे बहुआयामी व्यक्तीमत्व असल्यामुळे आमच्या कुस्ती केंद्रातील हॉलला त्यांचे नाव देण्यात आले आहे, असेही पाटील म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button