breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला ठरलेला नाही, देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री – नितीन गडकरी

मुंबई | महाईन्यूज | प्रतिनिधी

“गरज पडल्यास मी मध्यस्थी करायला तयार आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार बनेल. जेवढी माझी माहिती आहे, त्यानुसार अडीच अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरला नाही”, असं भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलंय. ते मुंबईत बोलत होते.

जेव्हा बाळासाहेब होते तेव्हादेखील ज्यांचे जास्त आमदार त्याचा मुख्यमंत्री असे असायचे, असं म्हणत नितीन गडकरी यांनी भाजपचाच मुख्यमंत्री होईल, असं एकप्रकारे जाहीर केलं आहे. अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यावर भाजपा हायकमांडचा नकार कायम आहे. त्यामुळे आता नितीन गडकरी हे स्वत: उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे.

तिरस्त व्यक्तीने मध्ये पडण्याचं कारण नाही : संजय राऊत

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषद घेतली. “नितीन गडकरी मुंबईचे रहिवासी आहेत, त्यांचं घर वरळीत आहे, ज्यांचं घर मुंबईत आहे. त्यांनी मुंबईला येणं ही काही बातमी नाही. नितीन गडकरींकडे मुख्यमंत्रिपदाबाबत कुठलं लिखित पत्र असेल तर मला सांगावं, मी उद्धव ठाकरेंना कळवतो. आम्हाला कोणाच्याही मध्यस्थीची गरज नाही. उद्धव ठाकरे आपल्या निर्णयावर ठाम आहेत. तिसऱ्या व्यक्तीने मध्ये पडण्याचं कारण नाही”, असं संजय राऊत म्हणाले.

अबब… शिवसेना आमदाराला भाजपकडून चक्क 50 कोटींची ऑफर : वडेट्टीवार

शिवसेनेच्या आमदाराला भाजपने 50 कोटींची ऑफर दिली, असा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. काँग्रेसच्या आमदारांशीही भाजपने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती वडेट्टीवारांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button