breaking-newsताज्या घडामोडीपुणे

अजितदादांनी घेतला करोनाचा धसका; कार्यक्रमस्थळी धूर फवारणी

पुणे |महाईन्यूज|

करोना विषाणूचा धसका केवळ सर्वसामान्य नागरिकांनीच नाही तर राजकारण्यांनीही घेतला आहे. पुण्यात तर करोनाचा रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लोकांशी हस्तांदोलन करणं बंद केलं आहे. एवढंच नव्हे तर आज त्यांच्या हस्ते एका हॉटेलचं उद्घाटन आहे, यापार्श्वभूमीवर या हॉटेल परिसरात धूर फवारणीही करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज लोणावळा येथे एका हॉटेलचं उद्घाटन आहे. त्यामुळे अजितदादा या कार्यक्रमस्थळी येण्यापूर्वीच हॉटेल परिसरात धूर फवारणी करण्यात आली आहे. तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी अधिक गर्दी न करण्याच्या सूचनाही कार्यकर्त्यांना देण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. शिवाय कार्यक्रमावेळी कोणीही हस्तांदोलन करू नयेत, अशा सूचनाही देण्यात आल्याचं समजतं. पुण्यात करोनाचा रुग्ण आढळला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर ही खबरदारी घेण्यात येत आहे. देशात करोनाचे संशयित रुग्ण आढळल्यापासून अजित पवार यांनी नागरिकांशी हस्तांदोलन करणंही बंद केलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button