breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अंनिसच्या हस्तक्षेप अर्जाला मान्यता, इंदोरीकर महाराजांच्या अडचणीत होणार वाढ

अहमदनगर – कायम वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांनी लिंग भेदभावाला प्रोत्साहन देणारं वादग्रस्त वक्तव्य केल्याच्या आरोपावरुन त्यांच्या विरोधात संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात आज (१८ सप्टेंबर) सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने अंनिसच्या हस्तक्षेप अर्जाला मान्यता देत अंनिसला लेखी युक्तिवाद करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे इंदोरीकर महाराजांच्या अडचणी आता वाढणार आहेत. दरम्यान, यापुढील सुनावणीत इंदोरीकर महाराज यांच्याविरोधात सरकारी वकिलासोबतच अंनिसचे वकिलही युक्तिवाद करणार आहेत.

निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्याविरोधात पीसीपीएनडीटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच प्रकरणी संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी सुरु आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी २८ ऑक्टोबरला होणार आहे. यावेळी अंनिसकडून इंदोरीकर महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन त्यांना कायद्याच्या चौकटीत पकडण्यासाठी पुरेपुर प्रयत्न होणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button