breaking-newsमुंबई

अंधेरी, गोरेगावमधील दोन घटनांमध्ये विजेचा धक्का बसून तिघांचा मृत्यू

मुंबई : अंधेरी आणि गोरेगाव परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये विजेचा धक्का बसून एका महिलेसह तिघांचा मृत्यू झाला, तर दोघे जखमी झाले. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील दोघांचा समावेश आहे.

महाकाली केव्हस रोड, इरवानी इस्टेट, दुर्गामाता मंदिराच्या मागे, गोरेगाव (पूर्व) येथे वास्तव्य करीत असलेल्या यादव कुटुंबाच्या घरात ही घटना घडली. राजेंद्र यादव (६०) यांचा पुत्र संजय (२४) याने पंखा सुरू करण्यासाठी बटन दाबले असता त्याला विजेचा धक्का बसला. मुलाला वाचविण्यासाठी राजेंद्र सरसावले आणि त्यांनाही विजेचा धक्का बसला. संजयची आई आशादेवी आणि भाऊ दिपू याने या दोघांना वाचविण्यासाठी धाव घेतली. मात्र त्यांनाही विजेचा धक्का बसला. या घटनेत जखमी झालेल्या चौघांनाही तात्काळ ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी राजेंद्र आणि संजय यांना मृत घोषित केले. आशादेवी आणि दिपू यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालयातील सूत्रांनी दिली. याप्रकरणी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.

अंधेरी पश्चिम येथील आरटीओ कार्यालयासमोरील अण्णा नगरमध्ये एक मोटरगाडी उभी होती. येथून गेलेली विजेची वायर तुटली आणि ती मोटरगाडीवर पडली. तेथून जात असलेल्या काशीमा युडियार (६०) यांचा गाडीला हात लागला आणि त्यांना विजेचा धक्का बसला. काशीमा यांना तात्काळ कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button