breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणव्यापार

टोला लगावल्यानंतरही आनंद महिंद्रांनी मानले मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार; म्हणाले…

मुंबई |

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र त्याआधी करोना रुग्णसंख्या वाढत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीरपण लॉकडाउनचा इशारा दिला होता. पण लॉकडाउनला महाविकास आघाडीमधील इतर मित्रपक्षांचा तसंच काही उद्योजकांनी विरोध दर्शवला होता. विरोध दर्शवणाऱ्यांमध्ये महिंद्रा ग्रुपचे संचालक आनंद महिंद्रा यांचाही समावेश होता. उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला संबोधित करताना आनंद महिंद्रांचा उल्लेख न करता टोला लगावला होता. पण यानंतरही आनंद महिंद्रा यांनी उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विट करत लॉकडाउन जाहीर न केल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आभार मानले आहेत. आनंद महिंद्रा यांनी ट्विटमध्ये मुख्यमंत्री कार्यालयाला टॅग केलं आहे.

आनंद महिंद्रांनी आभार मानताना काय म्हटलं आहे –
लॉकडाउन लागू न केल्याबद्दल आभार मुख्यमंत्री कार्यालय…सतत संघर्ष करणाऱ्या छोट्या दुकानदारांसाठी मला वाईट वाटत राहतं. आता या करोनासंबंधित नियमांचं पालन करणं आपलं कर्तव्य आहे जेणेकरुन ही बंधनं लवकरात लवकर किंवा त्यानंतर मागे घेतली जातील.

वाचा- चिंताजनक! कचऱ्याच्या गाडीतून रुग्णालयाला व्हेंटिलेटरचा पुरवठा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button